June 9, 2023

About Us

कोणतीही व्यक्ती एकटी सर्व ज्ञान मिळवू शकत नाही. कोणालाही सर्वच भौगोलिक क्षेत्रात प्रत्यक्ष फिरणे शक्य नाही. यासाठी Connectivism theory (जुळणीवाद प्रणाली) चा वापर केल्यास त्या-त्या ठिकाणचे नेटवर्कमधील संबंधित व्यक्ती उदाहरणार्थ शिक्षक, विद्यार्थी व पालक हे विशिष्ट घटकाशी संबंधित माहिती, फोटो, व्हिडीओ शेअर करतील. त्यामुळे कमी वेळात योग्य माहिती मिळून विशिष्ट घटक विद्यार्थ्यांना समजावून देता येईल. यासाठीच connectivism.in या वेबसाईटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अद्ययावत व परिपूर्ण शिक्षण देण्याच्या उद्देशाने आम्ही कार्य करत आहोत.

जॉर्ज सायमन आणि स्टीफन डाउन्स यांनी आधुनिक युगासाठी connectivism (जुळणीवाद) हा नवीन शिक्षण सिध्दांत विकसित केला आहे. या सिद्धांताचा वापर करून वेगवेगळ्या शाळांतील शिक्षक, विद्यार्थी, पालक व इतर संबंधित व्यक्ती एकमेकांना इंटरनेटद्वारे जोडून त्यांच्या ज्ञानाचा सर्व विद्यार्थ्यांना उपयोग करून देण्याचा आमचा उद्देश आहे.

मुलांना वर्गाच्या साचेबद्द चौकटीतून मोकळे करून, त्यांच्या विचारांवर मर्यादा घालणाऱ्या पारंपरिक मानसिक बंधनातून त्यांना सोडवण्याची गरज आहे. तरच शिक्षणाचा खरा अर्थ आणि हेतू साध्य होईल. सततच्या बदलणाऱ्या माहितीमुळे जे आज बरोबर आहे ते उद्या चूकीचे असू शकते. अशा परिस्थितीत Connectivism theory (जुळणीवाद प्रणाली) मुळे अचूक व अद्ययावत ज्ञान विद्यार्थ्यांना मिळू शकेल. विद्यार्थी स्वयं अध्ययनाने ज्ञान मिळवतील व स्वतःच्या ज्ञानकक्षा रूंदावतील.